वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!

Highlights

वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!

 

p वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!

वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!  रावेरमधून तृतीयपंथी उमेदवाराला संधी !
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून अन्य पक्षांच्या एक पाऊल पुढे टाकले. पक्षाने यावेळीही उमेदवारांच्या नावासमोर त्यांची जात नमूद करून सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शमिभा पाटील या उच्चशिक्षित असून, सध्या त्या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत. 

Screenshot%202024-09-22%20at%2016-10-33%20Shamibha%20Patil%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE...%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%20-%20maharashtra%20assembly%20election%202024%20who%20is%20vbc%20vidhan%20sabha%20raver%20constituency%20transgender%20candidat%20shamibha%20patil%20vanchit%20ca%5B...%5D वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!


तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात  दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून युवा चेहरा विनय भांगे दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपात गुंतलेली असताना, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

११ मतदारसंघातील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

    रावेर (जळगाव) – शमीभा पाटील, सिंदखेड राजा (बुलडाणा) – सविता मुंडे, वाशिम – मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे (अमरावती) – निलेश टी. विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे, साकोली (भंडारा) – डॉ. अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण – फारुख अहमद, लोहा (नांदेड) – शिवा नरांगळ, औरंगाबाद पूर्व – विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव (अहमदनगर) – किसन चव्हाण, खानापूर (सांगली) – संग्राम माने, सिंदखेड राजा मतदारसंघातून सविता मुंडे यांनी मागील वेळी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढविली होती.

Share News

तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तन चळवळीत योगदान देणाऱ्या सर्व महामानवांचा वैचारिक वारसा जपत निर्भीड, निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणारे मराठी न्यूज वेब पोर्टल..

Post Comment

You May Have Missed

You cannot copy content of this page